डॉ. श्री. द. देशमुख यांची ग्रंथसंपदा खालील प्रमाणे

( ग्रंथाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मुखपृष्ठावर क्लिक करा. )

 

मुखपृष्ठ

 

नाव - विवरण

 

पृष्ठसंख्या

 

किंमत (रूपये)

संसारसागरातील गीतादीपस्तंभ - भगवद्गीता हा आज 'हिंदूंचा धर्मग्रंथ' म्हणून विश्वात मान्यता पावला आहे. अनेकांनी या ग्रंथाचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केलेला दिसतो. अशी अनेक विवरणे आज आपल्यासमोर आहेत. प्रस्तुत ग्रंथाचा दृष्टीकोन मात्र अपूर्व व प्रामाणिक अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त दिसतो. प्रपंच करीत असतांना परमार्थाचे, मनुष्यजन्माचे अत्युच्य ध्येय गाठू पाहणाऱ्या साधकांना दृष्टीसमोर ठेऊन लिहिलेला साधकोपयोगी अप्रतीम असा हा ग्रंथ आहे. प्रत्येक श्लोकाचा सरल अर्थ व नंतर ते तत्त्वज्ञान जीवनात प्रत्यक्ष कसे उतरवता येईल, गीता प्रत्यक्ष जगता कशी येईल, त्यातून साधकाचा कसा व काय फायदा होईल हे विवरण येथे दिसते. २७६ १५०/-

अद्वैत मकरंद - श्रीलक्ष्मीधर कवीरचित, उत्तम अधिकाऱ्याला वेदान्ताचा गाभा शिकविणाऱ्या ह्या २८ श्लोकी ग्रंथाचे ओवीबद्ध भाषांतर व गद्य विवरण. परिशिष्टात वेदांतशास्त्रातील काही कठीण शब्दांच्या अर्थाची सूचीही आहे.

९१ ३०/-
अध्यात्म आणि जीवन - अध्यात्म विषयावरील विविध मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह या ग्रंथात आहे. साधकाने जीवनात कसे वागावे, कसे असावे, जीवनात अभ्युदय साधत असतांनाही ते जीवन साधनामय कसे बनवावे व प्राप्त परिस्थितीत आनंदात कसे राहावे हे ह्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेले आहे. शिवाय साधनेसाठी कोणते गुण, कशी मानसिकता हवी, मुक्ती म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय व हे साध्य कसे करून घ्यावे इ. साधकाच्या जिव्हाळ्याच्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. यातील विषय असे - शुद्ध परमार्थाची निकड, मानवी पुनर्वसन, हिंदू धर्म, चार पुरूषार्थ, समाज आणि धर्म, आध्यात्मिक मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि साधना, अध्यात्म आणि जीवन ( भाग १ ते ५ ) १२० ४०/-
आत्माराम ( विवरण ) - श्रीसमर्थांच्या "आत्माराम" ह्या ग्रंथशिरोमणीवर विवरण. मा. बेलसरे "आत्माराम" ला समर्थांचे हृदय म्हणत असत. पाच समासांच्या या ग्रंथात त्याग, ब्रह्म, माया, साधन व अनुभवांचे निरूपण आहे. मायेचा सर्वांगीण विचार या ग्रंथासारखा अन्य कोठे आढळत नाही.
९२ ३०/-
Indian way of life - 'चतुर्विध पुरुषार्थ' ह्या विषयावर लिहिलेला आकाराने लहान पण अर्थाने महान असा इंग्रजी ग्रंथ. १६ १५/-

कठोपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.

   

केनोपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.

   

बृहदारण्यकोपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.

   
ईशावास्योपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.    

मांडुक्यउपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.

   
प्रश्नोपनिषद्‌ - १०८ उपनिषदांपैकी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या ग्रंथाचे स्वरुप आहे.    
पंचदशी भावदर्शन - श्रीविद्यारण्य व श्रीभारतीतीर्थ विरचित वेदांत शास्त्रावरील एक संस्कृत ग्रंथ. ह्या ग्रंथामध्ये स्वामींनी उपनिषदातील अनेक प्रक्रिया एकत्र आणल्या असून त्या प्रक्रिया व उपनिषदातील ज्ञान
७६६ ३५०/-
आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी - श्रीमदाद्यशंकराचार्य लिखित श्रीगुरुशिष्य संवादात्मक अशा या छोट्या प्रकरणग्रंथाचे सार्थ विवरण. प्रश्नोत्तरीचा अंतर्भाव आता 'अध्यात्म आणि जीवन' ह्या लेख संग्रहात केला आहे.    
साधक सोपान - अध्यात्म विषयावरील विविध मासिकांतून प्रसिद्ध झालेले लेख, तसेच काही प्रवचनांवरून साधकांनी तयार केलेले लेख यांचा संग्रह या ग्रंथात आहे. प. पू. डॉ. काकांनी विहंगती नसणाऱ्या साठी साधक-सोपान बांधून दिला आहे. साधकाने प्रत्येक पायरीवर स्वतःच्या पावलांची पकड घट्ट जमवायची व सावधपणे वरच्या पायरीवर आरूढ व्हायचे इतके सोपे काम आहे. यातील विषय असे - आस्तिक-नास्तिक, मायातत्व, प्रवृत्ती-निवृत्ती, विवेक, वैराग्य, शमादिषटक्‌, मोक्षेच्छा तनुचतुष्ट्यनिरसन, निष्काम कर्मोपासना, श्रीगुरुनिष्ठा, गावी आनंदाची गाणी. २१६ ५०/-
साधकबोध - अध्यात्म विषयावरील विविध मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह या ग्रंथात आहे. प्रत्येक स्तरावरील साधकाला शुद्ध परमार्थाच्या पथावर अग्रेसर होण्यासाठी बोधसंजिवनी देणारा हा ग्रंथ सर्वांना उपयोगी पडेल. यातील विषय असे आहेत - वंशीधराचा वेणू, अभंग संकीर्तन, एकविसाव्या शतकातील किर्तनकला, भजन आणि ब्रह्मज्ञान, भ्रम, अनंत राघवाचे स्वरूप, ऐश्वर्ययोग, नैष्कर्म्यसिद्धी, ते हे संत, साधू दिसती वेगळाले, अध्यात्म विद्येत गुरुशिष्य संवादाचे महत्त्व, या नाव साधक, साध्य होता साधनाचा ठाव नाही, साधनेच्या विविध व्याख्या (डॉ. देशमुख यांच्या प्रवचनांमधून केलेले संकलन), आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी. १४२ ४५/-
श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (एक अभ्यास) - वारकरी संप्रदायात अत्यंत मान्य व सुप्रसिद्ध अशा ह्या ग्रंथाचे विवरण. हरिपाठासोबत डॉ. देशमुख यांचा 'संप्रदाय' हा छोटेखानी ग्रंथ अंतर्भूत केला आहे. संप्रदाय ही संकल्पना, त्याची आवश्यकता व विविधतेतील एकत्व यांचे सुलभ विवरण येथे दिसते.
१४४ ३५/-

श्रीनारद-भक्तिसूत्रे - श्रीनारद मुनींनी रचलेल्या भक्तिशास्त्रावरील ह्या सूत्रबद्ध ग्रंथाचे सार्थ विवरण.

११२ ३०/-

श्रीमत् दासबोध - सार्थ व सटीक (प्रसाद प्रकाशन) - श्रीमत् दासबोधातील ओव्यांचा सुलभ अर्थ व विवरण. ओवी व तिच्याखाली अर्थ अशी ग्रंथाची रचना असल्याने आवश्यक तेथे अधिक स्पष्टीकरण दिलेले आहे. इतर कोणत्याच प्रतीत ते शक्य झालेले नव्हते. त्यामुळे आजवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रतीत मेरुमणी ठरावा असा हा ग्रंथ आहे.

८२५ ३५०/-

पावा - एकूण ७० कवितांचा संग्रह. ह्यातील कविता-गीते-अभंग अनेक निमित्ताने किंवा निसर्गाच्या सान्निध्यात कवीला स्फुरलेली आहेत. प्रत्येक कवितेत परतत्वस्पर्श जाणवतो.

९० ५०/-

श्रीमुकुंदराज विरचित विवेकसिंधू - सार्थ व सटीक (प्रसाद प्रकाशन) - आद्य मराठी कवी श्रीमुकुंदराज ह्यांचा वेदांतातील प्रक्रिया व तदनुसार साधना पद्धती या विषयावरील अप्रतिम ग्रंथ. हा मुमुक्षू तसेच अभ्यासक अत्यंत उपयोगी असा ग्रंथ आहे. ओव्यांचा अर्थ व विवरण असे या टिकाग्रंथाचे स्वरूप आहे. ओवी व त्याखाली अर्थ अशी रचना असल्याने आवश्यक तेथे अधिक विवरण केलेले आहे.

३४२ २५०/-

अनुग्रह - श्रीगुरू व शिष्य ह्यांचे संबंध, अनुग्रहाची प्रक्रिया व त्याची आवश्यकता ह्यांचे स्पष्टीकरण या ग्रंथात आहे. अनुग्रहात श्रीगुरू शिष्यभावाने शरण आलेल्या व्यक्तीला त्याच्या पारमार्थिक वाटचालीत मार्गदर्शन करतात, पूर्णतेकडे जाण्याचा मार्ग दाखवतात, जबाबदारी स्वीकारतात. अनुग्रह या विषयावरील अनेक गैरसमज दूर करणारा ग्रंथ.

५५ २५/-

दासबोध चिंतनिका - श्रीमत् दासबोधातील सर्व ओव्यांचे अर्थ किंवा मूळ संहिता या ग्रंथात दिलेली नाही. तथापि दासबोधातील कठिण शब्द व कूट ओव्या यांचे वेदांतशास्त्रप्रक्रियेला धरून विवरण केलेले आहे. ओव्यांचा सखोल अर्थ जाणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ.

३३५ १२५/-

आद्यशंकराचार्यविरचीत स्तोत्रावली - मराठी सटीक अनुवाद (दोन खंड - प्रसाद प्रकाशन) - आद्यश्रीशंकराचार्यांच्या भक्ती - योग - ज्ञान रसपूर्ण स्तोत्रांचे सार्थ विवरण.

६४० ३००/-

सुखाचा शोध - भक्तियोग ह्या त्रैमासिकात प्रसिद्ध झालेल्या तेरा लेखांचा संग्रह. यातील सर्वच लेख वाचनीय व मननिय असे आहेत. प. पू. गुरुनाथ मुंगळे यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. लेखांची शीर्षके पुढीलप्रमाणे - सुखाचा शोध आणि बोध, ब्रह्मज्ञान, श्रीगुरूंचे श्रीगुरुत्व, ईश्वरदर्शनाचा मार्ग, गीता - अध्यायांचे परस्परातील नाते, कर्मविपाक, अजपाजप, संतसाहित्य, श्रीसमर्थांचा जीवनवाद, या नरदेहाचेनी संमंधे, कीर्तनाचे स्वरूप व महिमा, त्रिगुण, गुणसंपदा, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, वृद्धांच्या जीवनासाठी तत्त्वज्ञान, जाबाल दर्शनोपनिषद्.

१४८ ५०/-

श्रीसद् गुरू बाळू मामा विजयग्रंथ - मुरगुडजवळील 'आदमपूर' ह्या गावातील प्रसिद्ध अवलिया संत बाळू मामा धनगर यांची ओवीबद्ध चरित्रपोथी. संत बाळू मामांचे भक्त ही पोथी पारायणासाठी वापरतात. चरित्रकारांनी सांगितलेल्या फलाचा त्यांच्या आशीर्वादामुळे त्या भक्तांना अनुभवही येतो. बाळूमामांच्या समाधीमंदिरातील सभागृहाच्या भिंतींवर ह्या पोथीतील अनेक ओवीरत्ने दिसतात.

६०
 

श्रीएकनाथी हरिपाठ - भावदर्शन - श्रीज्ञानदेवांच्या हरिपाठानंतर श्रीएकनाथांचा हरिपाठ वारकरी संप्रदायात लोकप्रिय आहे. पंचवीस अभंगांच्या या हरिपाठावर अर्थ व विवरणात्मक अशी हि टिका आहे. अनेक ठिकाणी संतांची व उपनिषद् मंत्रांची प्रमाणे आहेत. यामुळे आकलन व आचरण यासाठी सुलभ झालेला हा ग्रंथ आहे. श्रीएकनाथांच्या पैठण येथील देवघराची व वाड्याची सुंदर छायाचित्रे या ग्रंथात समाविष्ट आहेत.

५५ ४०/-

 

संपादित ग्रंथ - लेखक श्रीशंकर महाराज खंदारकर
 

वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी व पसायदान यावर श्रीशंकरमहाराज खंदारकरांसारख्या गाढ्या विद्वानाने विवरण केलेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या ग्रंथांचे संपादन करण्याचे मोठे अवघड काम डॉ. श्री. द. देशमुख ह्यांनी मोठ्या आवडीने व प्रेमाने केलेले आहे. 

 

सार्थ एकनाथी भागवत (दोन खंड) - श्रीमद् भागवत महापुराणातील ज्ञानप्रधान अशा ११व्या स्कंधावर श्रीएकनाथमहाराजांनी टीका लिहिली. श्रीखंदारकरमहाराजांनी ह्या टीकेवर सार्थ विवरण केलेले आहे. मूळ श्लोक, एकनाथी टीका व अर्थ अशी रचना आहे.

   

सार्थ तुकाराम गाथा (दोन खंड) - श्रीतुकाराममहाराजांची अभंगगाथा शब्दांनी सुलभ वाटली तरी अर्थदृष्ट्या अवघड आहे. या ग्रंथाचे सार्थ विवरण येथे केलेले आहे.

   
ज्ञानेश्वरी भावदर्शन (दोन खंड) - श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी लिहिलेल्या श्रीमद्भगवद्गितेवरील टीकेचे सार्थ विवरण. ओवी व त्याखालीच अर्थ अशी ह्या ग्रंथाची रचना असल्याने आवश्यक तेथे विस्तृत विवरण दिलेले आहे.
   

ज्ञानदेवांचे पसायदान - पसायदानावरील विवरणात्मक ग्रंथ. या ग्रंथाचे मा. डॉ. श्री. द. देशमुख यांनी इंग्रजी भाषांतर केलेले आहे.

   

 

आगामी ग्रंथ

श्रीमदाद्यशंकराचार्यांचे पट्टशिष्य श्रीसुरेश्वराचार्य यांच्या 'नैष्कर्म्यसिद्धी' ह्या प्रसिद्ध पण दुर्मिळ ग्रंथाचे सार्थ विवरण.