(व्हिडिओ) अभिप्रायासाठी फोटोवर click करा

प.पू. मंदाताई गंधे -

" विद्याविभूषितांपासून अल्पशिक्षितांपर्यंत, बंधुभगिनी, सर्व वयाचे असे बहुसंख्य शिष्य आहेत, साधक आहेत की जे काकांच्या ठिकाणी त्यांना गुरू म्हणून त्यांच्या पायी नतमस्तक झाले आहेत. ते स्वतःच जीवन धन्य झाल आहे अस समजतात. ................ काका मुळामध्ये ज्ञानयोगी आहेत. अद्वैत वेदांत हा त्यांचा विषय आहे. आणि म्हणून त्यांच प्रवचन परमार्थातल्या कोणत्याही विषयावर ठेवलं तरी ते अद्वैत तत्त्वज्ञानाची त्याच्यामध्ये हळुवार पेरणी केल्याशिवाय सोडीत नाही. "

 

 

" डॉ. हे स्वतः वारकरी संप्रदायाचे आहेत. पण वारकरी संप्रदायात राहून सुद्धा त्यांनी समर्थ संप्रदायाचा उत्तम अभ्यास केला आहे................. त्यांची वेदांत मांडण्याची जी पद्धती आहे ती उत्तम असल्यामुळे ते दोन्ही संप्रदायात खूप मोठे महात्मे म्हणून समजले जातात. "

प.पू. मारुतीबुवा रामदासी -

 

वक्तादशसहस्त्रेषु स्व. श्री. राम शेवाळकर -

"त्यांनी सर्व भारतीय दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला व तो केवळ शैक्षणिक पातळीवरून केला नाही, केवळ ज्ञान ग्रहणात्मक दृष्टीने केला नाही व केवळ आपल्याला विद्वत्ता दाखविता यावी या साठीही केला नाही. तो त्यांच्या ज्ञानसाधनेचा भाग होताच पण प्रामुख्याने तो त्यांच्या अध्यात्मिक साधनेचा भाग होता.......... हे धर्म संगोपनाचे कार्य काका आपल्या आयुष्यभर करत आले आहेत, धर्म संगोपनाचे जे नर। ते ते ईश्वरी अंशावतार ॥ "