प. पू. मंदाताई गंधे व श्रद्धेय मुळेशास्त्री

अमेरिका - कार्यक्रम २०१८'पंचतारांकित' प्रवचनमाला ( Webinar ) -


संत आनंदाचे स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ दा. १.५.१६ ॥

संतांचे जीवन आनंदमय असते. सुखच जणू त्यांच्या रुपाने आकाराला येते. त्रिविध ताप नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची विद्या त्यांच्याकडून घ्यावी.
महाराष्ट्राची भूमी तर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. या संतांच्या मांदियाळीतील प्रमुख पाच म्हणजे संत श्रीज्ञानेश्वर महाराज, संत श्रीएकनाथ महाराज, जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज, संत श्रीनामदेव महाराज आणि समर्थ श्रीरामदासस्वामी.

परमार्थ प्रांतातील जणू काही हे पाच तळपते तारेच! त्यांच्या तत्त्वज्ञानाचे, भक्तीचे व एकंदर जीवनसुत्राचे साररुप दर्शन म्हणजे हा Webinar !

परमार्थातील अतिशय अधिकारी वक्त्यांकडून आपल्या शाश्वत हिताची वाणी श्रवण करण्याचा हा भाग्याचा दुर्मिळ योग.

सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा व इतरानांही कळवावे हि विनंती. आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत प. पू. मंदाताई गंधे व श्रद्धेय मुळेशास्त्री.

ज्या श्रोत्यांना प्रवचनांना प्रत्यक्ष हजर रहायचे असेल (स्थळ - Cupertino, CA) त्यांनी upasana@vedantbhaskar.org वर संपर्क साधावा.


प. पू. मंदाताई गंधे


प.पू. मंदाताईंचे वास्तव्याचे गाव अमरावती. संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रात त्या सुपरिचित आहेत. लौकिक क्षेत्राचा विचार करता त्या गणित ह्या विषयाच्या शिक्षिका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विख्यात आहेत. अनेक वर्षे त्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या सन्माननीय सदस्य होत्या.
त्यांचे वडील वैकुंठवासी श्री भगीरथबुवा गंधे व प पू ताई महाराज यांच्याकडून बालवयापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार झाले. वेदांत, भगवतगीता , संत साहित्य व विशेषतः ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अखंड चिंतनाचे विषय आहेत. हे चिंतन प्रवचनांच्या माध्यमातून गेली ५०-६० वर्षे त्या सर्वत्र मुक्त हस्ताने सर्वांना देत आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या संपूर्ण भागात त्यांनी आजवर हजारो प्रवचने केली आहेत.
अत्यंत स्पष्ट व स्वच्छ स्पष्टीकरण , सरळ व सोपी भाषा , श्रुती वचने व संत वचनांचा सुयोग्य वापर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना पटतील व कायम लक्षात राहतील असे व्यावहारिक सोपे दृष्टांत ही त्यांच्या प्रवचनांची खास वैशिष्ट्ये.

अध्यात्मविद्या मुक्त कंठाने सर्वांना देणे हेच त्यांचे जीवनव्रत आहे, ही त्यांची जीवन निष्ठा आहे. महाराष्ट्रातील सर्व आध्यात्मिक पीठे, विद्यमान सकळ संत , विद्वान ह्या सर्वाची त्यांची स्नेह पूर्ण ओळख आहे. हे सर्व आध्यात्मिक कार्य करण्यासाठी भगवंतांनी त्यांना अत्यंत रसाळ व प्रेमळ वाणी दिली आहे.
अमरावतीत अम्बापेठेतील सुप्रसिद्ध श्री गोपालकृष्ण मंदिराच्या त्या विद्यमान अध्यक्षा आहेत. तेथील सर्वच कार्यक्रमांचे नियोजनपूर्वक अतिशय उत्कृष्ट आयोजन त्या सर्वांकडून करवून घेत असतात. त्यांचे प्रवचन श्रवण करायला मिळणे, ही फार मोठी पर्वणी व भाग्याची गोष्ट आहे.

माऊलींच्या शब्दात सांगायचे तर -
सूर्ये अधिष्टीली प्राची । जगा राणीव दे सौख्याची । तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ।। श्री ज्ञानेश्वरी ।।श्रद्धेय मुळेशास्त्री


लौकिक परिचय : सायन्स शाखेचे बी. एस् सी. चे पदवीधर असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्या बँकेच्या नोकरीतून ब्रँच मॅनेजर (शाखाधिकारी) ह्या पदावरून ५/६ वर्षांपूर्वी निवृत्त. बँकेच्या अखिल भारतीय युनियन असोशिएशन चे सेक्रेटरी, उपाध्यक्ष सारखी महत्त्वाची पदे भूषविलीत. त्या निमित्ताने मोठ मोठ्या शहरांमध्ये भ्रमंती. त्यांचा ज्योतिष शास्त्रांचा पण अतिशय चांगला अभ्यास आहे.

पारमार्थिक परिचय : घरातील वडिलोपार्जित पिढीपासून पूजा अर्चादिक, व्रत वैकल्ये आदि वैदिक आचरण संस्कारामुळे त्यांना लहानपणापासूनच परमार्थ मार्गाची ओढ व अभ्यास ह्यामुळे विवेक वैराग्याकडे विशेष कल. त्यामुळे शास्त्रांचा, सर्वसंत ग्रंथाचा, गीतेचा व उपनिषदांचा चांगला अभ्यास. लहान वयात १५/१६ वर्षीच "स्वानंद साम्राज्य" सारख्या परमार्थ व वैदिक शास्त्राचा पद्धतशीर अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे अनेक वेळा वाचन व पारायण. त्यामुळे वेदांताबद्दलची व शास्त्रीय पारिभाषिक शब्दार्थांची चांगली जाण व विचारांचा स्पष्टपणा. त्यांचा परमार्थाकडचा कल, शास्त्र, गीता व उपनिषदे ह्या प्रस्थान त्रयीचा अभ्यास शिवाय पंचदशी, विचार सागर ह्या सारख्या वेदान्त ग्रंथांचा त्यांचा अभ्यास पाहता, प. पू. डॉ. काका देशमुख (मुरगुड) व प. पू. मंदाताई गंधे ह्यांच्या सोबत गावोगावी व परदेशात होणाऱ्या अभ्यास वर्ग शिबिरांमध्ये गेल्या ५/६ वर्षांपासून आचार्य म्हणून अंतर्भाव. नोकरीनिमित्त नागपूरला २/३ वर्षे प. पू. काकांच्या अभ्यास शिष्य परिवारीतील बंधू भगिनिंना "पंचदशी" व "विचार सागर" हे ग्रंथ समजावून सांगितले. आज त्यांना मुळेशास्त्री ही अनौपचारिक पदवी त्यांच्या मित्रपरिवारामध्ये व संबंधितांमध्ये प्राप्त झाली आहे.ध्वनिमुद्रण -
प्रवचने झाल्यानंतर येथे लगेच उपलब्ध करून देण्यात येतील

To download MP3 File, Right-Click and Save Target As

दिनांक
विषय
दिनांक
विषय
११ जून २०१८
२५ जून २०१८
१२ जून २०१८
२६ जून २०१८
१३ जून २०१८
२७ जून २०१८
१४ जून २०१८
९ जुलै २०१८
१८ जून २०१८
१० जुलै २०१८
१९ जून २०१८
११ जुलै २०१८
२० जून २०१८
१२ जुलै २०१८
२१ जून २०१८
१६ जुलै २०१८
१७ जुलै २०१८
१८ जुलै २०१८
१९ जुलै २०१८
२० जुलै २०१८


-------------------------------------------

 

आध्यात्मिक अभ्यासवर्ग : १६-१७ जून व २३-२४ जून २०१८


विषय - छांदोग्य उपनिषद् (अध्याय ७ वा)

प्राचीनतम दशौपनिषदांपैकी एक असलेले, सामवेदाच्या अंतर्गत येणारे छांदोग्य हे उपनिषद् आहे.

प्रामुख्याने मध्यम अधिकाऱ्याच्या उपदेशार्थ असलेला ७ वा अध्याय २६ खंडात विभागलेला आहे. सकल विद्यासंपन्न असलेले श्रीनारदमुनी, ऋषी सनत्कुमारांना, 'मी मंत्रवित् आहे आत्मवित् नाही' असे सांगून आपल्या शोकाचे निवारण करण्याची विनंती करतात. 'तत् त्वम् असि' हे महावाक्य व 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे महत्त्वाचे' अवांतर' वाक्य अंतर्भूत असलेले उपनिषद् समजावून घेण्यासाठी हा अभ्यासवर्ग.

अभ्यास वर्गामध्ये सकाळ (९ ते १२) व सायंकाळ (४-७) अशी दोन सत्रे असतील. मधील वेळात इतर अध्यात्मपर कार्यक्रम तसेच प्रसाद भोजनाची व्यवस्था असेल.

या अभ्यासवर्गाला कोणतेही शुल्क नाही याची कृपया नोंद घ्यावी.

आपल्याला अभ्यासवर्गाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास upasana@vedantbhaskar.org वर संपर्क साधावा.-------------------------------------------

आध्यात्मिक शिबिर - २९ जून - १ जुलै २०१८

- आचार्य -
प. पू. स्वामी गोविंददेव गिरि, प. पू. मंदाताई गंधे व श्रद्धेय मुळेशास्त्री